
wajle ki bara - bela shende lyrics
चैत्र पुनवेची रात आज आलीया भरात
थड थड काळजात माझ्या मायेना
कधी कवा कुठ कस जीव झाल येड पीस
त्याचा नाही भरवस तोल राहीना
राखिली कि मर्जी तुमच्या जोडीन मी आले
पिरतीच्या या रंगी राया चिंब ओली मी झाले
राया सोडा आता तरी काळ येळ नाही बरी
पुन्हा भेटू केंव्हातरी साजणा …
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा …(४)
हे कशापायी छळता माग माग फिरता
अस काय करता दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी
हे सहाची भी गाडी गेली नवाची भी गेली
आता बाराची गाडी निघाली
मला जाऊ द्या ना घरी
आता वाजले कि बारा …(२) || धृ ||
ऐन्यावानी रूप माझ उभी ज्वानीच्या मी उंबर्यात
नादवल खुळपिस कबुतरही माझ्या उरात
भवताली भय घाली रात मोकाट हि चांदण्याची…
उगा घाई कशापायी हाये नजर उभ्या गावाची …
नारी ग राणी ग हाये नजर उभ्या गावाची…
हे शेत आल राखणीला राखू चारा गोळा
शीळ घाली कुठून कोणी करून तिरपा डोळा
आता कस किती झाकू सांगा कुठवर राखू
राया भान माझ मला राहीना…. || १ ||
आल पाड झाला भार भरली उभारी घाटाघाटात
तंग चोळी अंग जाळी टच्च डाळिंब फुट व्हटात
गार वार झोंबणार द्वाड पदर जागी ठरना
आडोशाच्या खोडीचं मी कस गुपित राखू कळना
हे . नारी ग रानी ग कस गुपित राखू कळना
मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा
औन्धाच्या बा वर्सला मी गाठल वय सोळा
जीवा लागलीया गोडी तरी कळ काढा थोडी
घडी आताची हि तुम्ही राहू द्या … || २ ||
Random Song Lyrics :
- sneakin - yxng nunu lyrics
- jewish bobby shmurda - yung clvg lyrics
- bang bang - keya lyrics
- kid on the block - cole the vii lyrics
- malinche - alex anwandter lyrics
- so was wie liebe - ella endlich lyrics
- movin´ - pato banton lyrics
- скромная - alim lyrics
- little wolf - paul kelly lyrics
- all day all night - shinee lyrics