lirikcinta.com
a b c d e f g h i j k l m n o p q r s t u v w x y z 0 1 2 3 4 5 6 7 8 9 #

sakhya chalabagamadhi - usha mangeshkar lyrics

Loading...

सख्या चला बागामधी रंग खेळू चला!

गुलाल गोटा घ्यावा लाल हाती
तो फेकुन मारा छाती
रंगभरी पिचकारी तुमच्या हाती
तरी करीन मी ती रिती
जसा वृंदावनी खेळे श्रीपती
(गोपी घेऊन सांगाती)
मोद होईल मज हळूच जवळी धरा
अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला!

लाली लाल करावा पोशाख तुम्ही
रथ सजवुनी बहुगुणी
आज्ञा करा हो माझे लाल धनी
लाल नेसेन मी पैठणी
लाल कंचुकी आवडते मज मनी
(हिला शोभतो तन्मणी)
आत्ता राया चला सण शिणगाराचा करा
अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला!

Random Song Lyrics :

Popular

Loading...